पोस्ट्स

HARISHANDRAGAD हरिश्चन्द्रगड

इमेज
किल्ले हरिश्चन्द्रगड हा एक सह्याद्रीतील अनंत दुर्गवैभवांपैकी एक. अहमदनगर जिल्ह्याला भूगोलाचे वरदान आहे. कळसुबाई शिखर, सांदण दरी, रतनगड, भंडारदरा ते माळशेज घाट हा परिसर निसर्गवैभवाने नटलेला आहे. कोणत्याही ऋतूत जा तिथे निसर्गाचा अपूर्व असा अविष्कार दिसल्याखेरीज राहत नाही. तसा सह्याद्री खूप सुंदर आहे परंतु सह्याद्रीचे रौद्रभीषण रूप पाहायचे झाले तर हा परिसर सुंदर निवड ठरतो. खूप दिवसांपासून हरिश्चन्द्रगड पाहायची इच्छा होतीच परंतु ताळमेळ काही बसत नव्हता. नंतर नगर ला असताना डिसेंबर महिन्यात सगळ्यांचे नवर्षाच्या स्वागताचे (मराठीत सांगायचं झालं तर थर्टी फर्स्ट !) बेत ठरायला लागले आणि या योगायोगात मला आठवला तो हरिश्चन्द्रगड. तास पहिलं तर दररोजच्या आरामदायी जीवनशैलीमुळे भटकंती आजकाल खूप कमी होत चालली आहे. आजच्या या व्हाटसअपीकरण, फेसबुकीकरणामुळे निसर्गभ्रमण, सह्यांकन करण्याची आवड असलेली जमात फारच दुर्मिळ होत चालली आहे. मी जायचा विचार मांडला तेव्हा चार पाच जण तयार होते, काही जाणकार मंडळींनी आधीच नकार कळवला होता. शेवटी ३१डिसेंबर २०१६ ला सकाळी  मी आणि आकाश असं दोघांनी दिल्लीगेट वरून प्रस्थान के